शिक्षण: दहावी, ज्योतिष, धर्मशात्र, खगोल, पंचांग गणित, मंत्रशात्र, वास्तुशात्र व संस्कृत पारंपारिक पद्धतीने
पदवी व मानसन्मान: प.पू. जगद्गुरु शंकराचार्य कांची काम कोटी यांचेकडून महावत्र प्रदान, महाराष्ट्र ज्योतिष परिषद यांचेकडून सन्मान आणि इतर अनेक सन्मान
लेखन: लोकसत्ता दैनिकांत लेख, लोकप्रभा साप्तहिकांत धर्मशास्त्र लेख, ग्रंहाकिंत - पुणे, ज्योतिष धर्मशास्त्र लेख, ब्राह्मज्ञानामध्ये विविध विषयांवर लेख, दैनिक नवशक्ति, लोकमत सारख्या वृत्तपत्रात ज्योतिष विषयक लेखन, अनेक प्रासंगिक लेख
प्रकाशित पुस्तके: श्री शक्ती उपासना, बुद्धीवर्धक स्तोत्रे, पंचांग दिनविशेष
दूरचित्रवाणी कार्यक्रम: अल्फा मराठी दिनविशेष आणि ज्योतिष, ई-टि.व्ही. मराठी दिनविशेष ज्योतिष
व्याख्याने / प्रवचने: महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक वगैरे राज्यांत धर्मशास्त्र, मंत्रशास्त्र, वास्तुशास्त्र, मुहूर्तशास्त्र वगैरे विषयांवर
सार्वजनिक क्षेत्रे: श्री आंगिरस वेद पाठशाळा, संस्थापक
अथर्व न प्रकाशनातर्फे दरवर्षी श्री स्वामी समर्थ दैनिक पंचांग (रोजनिशी स्वरूपात) प्रकाशित होते. या उपक्रमाचे यंदा हे आठवे वर्ष. यामधे १जानेवारी ते ३१ डिसेंबर असे संपूर्ण वर्षाचे दरदिवशी चे पंचांग त्यादिवशी च्य| वैशिष्ट्य|सह दिले जाते. पंचांग + रोजनिशी असे त्याचे स्वरूप असल्यामुळे पुरोहित वर्गाने त्याचे उत्स्फर्त स्वागत केले आहे . स्वामी भक्तांचाही याला दरवर्षी वाढता प्रतिसाद आहे, पंचंगाशिवा य यामधे सर्वांना लागणारे मुहूर्त डोहाळे जेवण, बारसे, मुंज, विवाह, वस्तू, भूमिपूजन वाहन खरेदी, मुर्तिस्थापना तसेच शेतीसाठी उपयुक्त लागवड,कापणी, पेरणी असे सर्व प्रकारचे संपूर्ण वर्षाचे व त्यापुढील तीन महिन्यांचे मुहूर्त दरवर्षी दिलेले असतात. याशिवाय त्यावर्षातील ग्रहणे, गुरुपुष्य, तसेच गोत्र प्रवर, अवकडाहा चक्र आणि इतर आवश्यक माहिती यामधे आहे.